
नाशिक : मुलीचे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय कोट्यातून प्रवेश करून देण्याचे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मण हनुमंत तांबोळी ९, रा. पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, संतोषकुमार हरिचंद्र पाणिग्रही (रा. ओरिसा या संशयिताविरोधात गुन्हा दाखल आहे. तांबोळी यांच्या फिर्यादीनुसार, मुलीच्या प्रवेशासाठी संशयित संतोषकुमारने सप्टेंबर २०२२ ते मे २०२३ या कालावधीत फसवणूक केली. प्रवेश करून देत असल्याचे भासवून संतोषकुमारने तांबोळी यांची एक लाख रुपयांची फसवणूक केली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- शिवानी आपल्या सौंदर्याची लयलुट करताना…
- पिंपरी : आकाशातील तार्यांची निर्मिती कशी होते ? ‘ट्वीटर लाईव्ह’मध्ये पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली गंमतीशीर उत्तरे
The post नाशिक : मुलीच्या एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून लाख रुपयांना गंडा appeared first on पुढारी.