नाशिक : मुलीच्या शिक्षणासाठी दिली सायकलीची भेट

सायकल www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
देवळा सायकलिस्टचे अध्यक्ष व स्वप्निल ग्रो पोल्ट्री अ‍ॅण्ड हॅचरिजचे संचालक अरुण पवार यांनी मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणार्‍या सफाई कामगाराला नवीन सायकल भेट दिली. या दातृत्वाचे कौतुक होत आहे.

अरुण पवार व त्यांचे चिरंजीव वैभव हे गंगापूर रोडला (नाशिक) सोमवारी सकाळी फिरत असताना एका मॉलमध्ये सफाई कामगार असलेले अशोक शिंदे हे आपल्या मुलीला सायकलीवर बसवून लोटत नेत असल्याचे त्यांनी पाहिले. त्या सायकलीचे तुटलेले पँडल, शिटाला कापड गुंडाळलेली व अतिशय जीर्ण अवस्था पवार यांना अंतर्मुख करून गेली. माजी आमदार जयंत जाधव यांसह इतरांनी शिंदे यांची विचारपूस केली. चर्चेतून त्याची सायकलीची गरज ओळखून अरुण पवार यांनी सायकल देण्याचा मनोदय व्यक्त केले. त्यावर 24 तासांत अंमल करीत सायकल सुपूर्द केली. सायकल मिळाल्याने छोट्याशा मुलीच्या चेहर्‍यावर आनंदाचा भाव दिसून आला.

आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वच वाढदिवस हे गरजवंतांना मदत करूनच साजरे करत असतो. त्याचबरोबर विविध उपक्रम वर्षभर सुरूच असतात. मात्र गरजवंताला दिलेल्या मदतीचे समाधान हे प्रचंड आहे. – अरुण पवार, अध्यक्ष, स्वप्निल ग्रो पोल्ट्री अ‍ॅण्ड हॅचरिज, देवळा.

हेही वाचा:

The post नाशिक : मुलीच्या शिक्षणासाठी दिली सायकलीची भेट appeared first on पुढारी.