नाशिक : मुलीवर अत्याचार करुन अश्लील छायाचित्रे तिच्या नातेवाइकांना पाठविले

अश्लिल ,www.pudhari.news

नाशिक : अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेसोबत प्रेमसंबंध ठेवून नराधमाने राहत्या घरी तसेच कॅफेमध्ये बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच अश्लील छायाचित्रे काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पीडितेचे अश्लील छायाचित्रे तिच्या नातेवाइकांना व्हॉटसॲपद्वारे शेअर केले. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

 

The post नाशिक : मुलीवर अत्याचार करुन अश्लील छायाचित्रे तिच्या नातेवाइकांना पाठविले appeared first on पुढारी.