नाशिक : मुळडोंगरीच्या नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा : मुळडोंगरी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच जनाबाई सुरेश पवार, सदस्य सतीश मोरे चंद्रकाला पवार, गोटीराम चव्हाण, घीमाबाई बागुल सुनिता सोनवणे राधाबाई घुसळे वाल्मिम ठाकरे विकास सेवा संस्थाचे चेअरमन शुभम कासलीवाल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमात कांदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले की, गावाच्या विकासासाठी मी सदैव आपल्या सोबत आहे. प्रत्येक अडीअडचणी सोडविण्याचा मी प्रयत्न करेन, सर्वांना पक्षात मान सन्मान दिला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी सर्वांना दिला.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, नुतनभाऊ, कासलीवाल मिथुन पवार, बाळासाहेब कवडे, प्रमोद भाबड, जिल्हाप्रमुख किरण देवरे, रमेशभाऊ मोरे किरण मोरे, लखा चव्हाण, संजय चव्हाण, भैय्या राठोड, खडू राठोड, रमेश चव्हाण, संतोष चव्हाण, दादा टेलर, एन. के. राठोड, डॉ. प्रकाश चव्हाण, मुलचंद मोरे, सुनिल जाधव, सागर हिरे, संजय आहेर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

The post नाशिक : मुळडोंगरीच्या नवनिर्वाचित सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश appeared first on पुढारी.