नाशिक , पुढारी वृत्तसेवा : नाशिक पोलिसांनी सोलापूर येथील औद्योगिक वसाहतीत कारवाई करत एमडी (मेफेड्रॉन) तयार करण्यात येणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या कारखान्यातून दहा कोटी रुपयांच्या एमडीसह कोट्यवधींचा इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
सामनगाव येथे पकडलेल्या एमडी प्रकरणात संशयित सनी पगारे यास पोलिसांनी पकडले आहे. त्याने एका साथीदारामार्फत नाशिकमध्ये एमडी पुरविण्यासाठी सोलापूरात कारखाना सुरू केल्याची बाब समोर आली आहे.
नाशिकमधील सामनगाव परिसरात सप्टेंबर महिन्यात १२ ग्रॅम एमडीसह एका शर्मा नामक संशयितस पकडले होते. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करुन एमडी तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संयुक्तरित्या शुक्रवारी (दि. २७) सोलापूर एमआयडीसीत ही कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांच्यासह इतर अंमलदारांनी धाड टाकून संशयिताला ताब्यात घेत कारखाना उघडकीस आणला.
हेही वाचंलत का?
- अहमदनगर : मराठा आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील ३४ गावांत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी
- Maratha Reservation Protest : शिंदे समितीला मुदवाढ दिल्याने मराठा समाज संतप्त; जरांगेंची विशेष अधिवशेन बोलवण्याची मागणी
The post नाशिक : मॅफेड्रॉन तयार करणाऱ्या कारखान्यातून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.