नाशिक : मेंढपाळांच्या न्यायासाठी प्रहार जनशक्तीचे बिऱ्हाड आंदोलन

बिऱ्हाड आंदोलन

देवळा(जि. नाशिक) : पुढारी ऑनलाइन; प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश बिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी( दि. १६) देवळा येथे मेंढपाळांच्या न्याय हक्कासाठी तहसील कार्यालयावर बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले.

तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. शासनाने याची दखल घ्यावी या मागणीसाठी बिऱ्हाड आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मेंढपाळांना चराईसाठी जागा आरक्षित करण्यात यावी, मेंढपाळावर होणाऱ्या हल्ल्यांच्या संदर्भात योग्य तो कायदा अमलात आणावा आदी मागण्या करण्यात आल्या.  देवळा पाचकंदिल ते तहसील कार्यालयापर्यंत बिऱ्हाड आंदोलन काढण्यात आले.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष बापू देवरे, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, जिल्हा चिटणीस समाधान बागल, भाऊसाहेब मोरे आदींसह पप्पू व्हलगडे व तालुक्यातील मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : मेंढपाळांच्या न्यायासाठी प्रहार जनशक्तीचे बिऱ्हाड आंदोलन appeared first on पुढारी.