देवळा(जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा; संपूर्ण देवळा तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मेशी गामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत थेट सरपंच पदी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख बापूसाहेब शांताराम जाधव हे सर्वाधिक १ हजार १३९ मते मिळवून विजयी झाले. या ग्रामपंचातीच्या थेट सरपंच पदासाठी एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे देवळा तालुका प्रमुख बापूसाहेब शांताराम जाधव विजयी झाले .
उर्वरित प्रभागात विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- (कंसात मिळालेली मते) वार्ड क्रमांक १) योगेश चव्हाण ( २३२ विजयी ) , शिल्पा अहिरे ( २४५ विजयी ) वार्ड क्रमांक २) सतीश अंबादास बोरसे ( ५२४ विजयी ) वार्ड क्रमांक ३ समाधान चिंतामण गरुड ( २८६ विजयी ) , द्वारकाबाई सुभाष शिरसाठ ( २८२ विजयी ) , वार्ड क्रमांक ४ शाहू गंगाधर शिरसाठ (३६४ विजयी ), मनीषा कुवर ( ३०५ विजयी ) , वार्ड क्रमांक ५ गोरख बोरसे ( २६९विजयी ), तुषार शिरसाठ ( २२५ विजयी ) याप्रमाणे तर माघारीच्या दिवशी अनिता शिरसाट, दगूबाई शिरसाट, लीलाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष साजरा केला.
मेशी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाचे उमेदवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिरसाट तसेच वार्ड क्रमांक ५ मधील सदस्य पदाचे भाजपचे पंचायत समितीचे माजी सभापती केदा शिरसाठ यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
थेट सरपंच पदी शिवसेनेचे (उबाठा) तालुका प्रमुख बापुसाहेब जाधव, तर सदस्य पदाचे उमेदवार देवळा बाजार समितीचे संचालक शाहू शिरसाठ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार शिरसाठ विजयी झाले.
हेही वाचा :
- जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व ; भाजप दुसऱ्या तर अजित पवार गट तिसऱ्या स्थानी
- पठ्ठ्याने तंत्रज्ञानाद्वारे शोधली चोरी झालेली गाडी!
- Grampanchayat Result 2023 : शेळगाव ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा
The post नाशिक : मेशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उबाठाचे बापूसाहेब जाधव विजयी appeared first on पुढारी.