
नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
अविवाहित धाकट्या मेहुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणाच्या वादात धाकटा साडू बाजू घेत नाही, हा राग मनात ठेवून मोठ्या साडूने भाऊ व सहकार्यांच्या मदतीने लहान साडूला लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केली. त्यात तो जागीच गतप्राण झाल्याने चौघांविरोधात घोटी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संशयित फरार झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील रेल्वेस्थानक परिसरात एका लग्न सोहळ्यासाठी दोघे सख्खे साडू आपल्या कुटुंबीयांसह आले होते. दरम्यान या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अविवाहित मेहुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणातून वाद सुरू होते. धाकट्या साडूला हे प्रेमप्रकरण खटकत होते. त्यामुळे तू माझी बाजू न घेता सासुरवाडीची बाजू का घेतो, या कारणातून या दोन्ही साडूंमध्ये वाद सुरू होता. त्यात मोठ्या साडूला छोट्या साडूसह तीन सहकार्यांनी घोटीजवळून सिन्नर महामार्गाच्या रेल्वे पुलाजवळ बोलावून घेतले होते. याच कारणातून कुरापत काढून छोट्या साडूसह सहकार्यांनी मोठ्या साडूस हातातील लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने चेहर्यावर, डोक्यावर छातीवर, पोटावर मारहाण करून जागीच गतप्राण केले. घटनेनंतर सर्व चारही संशयित फरार झाले. घोटी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर हे अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा:
- दानापूर एक्स्प्रेसची गर्दी हटता हटेना ! चिमुकल्यासह आई अडकली गर्दीत
- मर्सिडीजपेक्षाही महाग 60 वर्षांपूर्वीचे घड्याळ!
- बोटा : अल्पवयीन मुलीस पळवून नेणार्या आरोपीस अटक
The post नाशिक : मेहुणीशी प्रेमप्रकरणाच्या संशयातून साडूचा खून appeared first on पुढारी.