नाशिक : मोटारसायकलींची समोरासमोर धडक; सिन्नरजवळ दोन ठार

अपघात दोन ठार

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
बारागाव पिंप्री- सिन्नर मार्गावर सुळेवाडी फाट्याजवळ बुधवारी (दि.5) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भरधाव वेगात जाणार्‍या दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात दोघे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. ऐन दसर्‍याच्या दिवशी दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

अनिकेत बबन दिघे (25, रा. कानडी मळा, सिन्नर) व सोमनाथ मधुकर हिलम (रा. पांढरेवड, मूळडोंगरी पो. साकोरा, ता. नांदगाव) अशी दोघा मृतांची नावे आहेत. अनिकेत हा हिरो शाईन मोटारसायकलने (एमएच 17 बीजी 7623) तर सोमनाथ हिलम दुसर्‍या होंडा लिनोआ मोटारसायकलने (क्र. एमएच 41 बीजे 1986) जात होता. भरधाव वेगात जाताना सुळेवाडी फाट्याजवळ दोघांची समोरासमोर धडक झाली. दोघेही जबर जखमी होऊन जागीच ठार झाले. मोटारसायकलींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

स्थानिक नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. जखमींना उपचारासाठी हलविले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई विलास जाधव पुढील तपास करीत आहेत.

The post नाशिक : मोटारसायकलींची समोरासमोर धडक; सिन्नरजवळ दोन ठार appeared first on पुढारी.