नाशिक : मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 26 मोबाईल जप्त

मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात,www.pudhari.news

सिडको : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

अंबड येथील चुंचाळे परिसरातील एका मोबाईल दुकानातून 65 हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्या कडून वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल २६ मोबाईल जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज इंद्रदेव निषाद (36 रा. चुंचाळे अंबड) यांच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 31 जुलै रोजी वेगवेगळ्या कंपनीचे 65 हजार रुपये किमतीचे 31 मोबाईल फोन चोरून नेले होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलिस शिपाई  हेमंत आहेर व पोलिस शिपाई जनार्दन ढाकणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचत संशयित आरोपी यासीर अहमद रजा खान (१८ वर्ष रा.बि. के. पेंटर बिल्डींग, रॉयल बेकरी समोर, संजीव नगर, चुंचाळे शिवार, अंबड,) व एक अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेत त्याच्याकडून 65 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे 26 मोबाईल जप्त करण्यात आले.
ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदन बगाडे, पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, पोलिस हवालदार योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे, किरण सोनवणे, प्रशांत नागरे, संदीप भुरे, हेमंत आहेर, जनार्दन ढाकणे, राकेश राउत, प्रविण राठोड, मोतीराम वाघ, नितीन सानप  यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम शेळके व पोलीस नाईक आंबेकर करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : मोबाईल चोर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 26 मोबाईल जप्त appeared first on पुढारी.