नाशिक : मोहाडीत मुंडण करुन सरकारचा निषेध

नाशिक

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर विविध आंदोलने सुरु आहेत. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु आहे. काल (दि.1) 101 मराठा आंदोलकांनी मुंडण करून आरक्षणासाठी रणशिंग फुंकलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला.

मोहाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कादवा कारखान्याचे संचालक शहाजी सोमवंशी, मविप्र संचालक प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोहाडी येथे साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. मोहाडी येथील सकल मराठा समाज पक्षविरहीत एकवटला आहे.

यावेळी रोज नव्या आणि कायदेशीर पध्दतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी माहिती दिली. मविप्र संचालक प्रवीण जाधव यांच्यासह 101 कार्यकर्त्यांनी मुंडन केले. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय समाज आता स्वस्थ बसणार नाही. ही लढाई नेटाने लढून आरक्षण पदरात पाडून घेऊ असे मराठा आंदोलकांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्व जाती धर्मातील नागरिकांनी आज (दि.2) पाठिंबा दिला आहे. मोहाडी येथे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व जण उपस्थित राहुन शांततेच्या मार्गाने उपोषण करत आहोत. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही सर्व जणांनी मुंडण केले आहे. जो पर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तो पर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मोहाडीत मुंडण करुन सरकारचा निषेध appeared first on पुढारी.