नाशिक : मोहाडी येथे विहीरीत पडुन साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू

मोहाडी www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) – पुढारी वृत्तसेवा

मोहाडी येथील सार्वजनिक विहीरीत पडून साडेचार वर्षीय बालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, दिशांत अजय गोवर्धने (वय 4 वर्ष 6 महीने रा. मखमलाबाद रोड, मधुबन काॕलनी, पंचवटी) हा चिमुरडा मोहाडी येथे आलेला होता. खेळता खेळता मोहाडी गावचे स्मशानभूमी परीसरातील सार्वजनिक विहीरीजवळ तो गेला असता विहीरीतील पाण्यात तो अनवधानाने पडला. विहिरीच्या खोल पाण्यात पडल्याने दिशांतचा बुडुन मृत्यु झाला. बापू गोवर्धने यांनी दिंडोरी पोलिसात माहिती दिली. तर दिशांतच्या आकस्मिक मृत्युची पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मोहाडी येथे विहीरीत पडुन साडेचार वर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.