नाशिक : यज्ञ सुरू असतानाच भगवान शंकराच्या मूर्तीवर अवतरले नागराज

नागराज,www.pudhari.news

येवला : (जि.नाशिक) पुढारी वृत्तसेवा

येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सोमवारी कालाष्टमीनिमित्त भाविकांच्या वतीने यज्ञ सुरू होता. दरम्यान हा यज्ञ सुरू असताना एक घटना घडली.  चक्क भगवान भोले शंकराच्या मूर्तीवर नागराज अवतरले अन् या नागराजांनी भगवान शंकराच्या गळ्याला वेडा देऊन तेथे ठाण मांडले.

घटनेबद्दल समजताच यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. हे सर्व पाहिल्यानंतर भाविकांनी कुठलाही आरडाओरडा न करता सर्पमित्राला याबाबत माहिती दिली.

सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन या नागराजाला सुरक्षित रित्या जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. दरम्यान या घटनेची चर्चा परिसरात होताच नागरिकांनी मंदिराच्या दिशेने धाव घेऊन दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा :

The post नाशिक : यज्ञ सुरू असतानाच भगवान शंकराच्या मूर्तीवर अवतरले नागराज appeared first on पुढारी.