नाशिक : युवती सेनेच्या शाखा वाढवा – खासदार श्रीकांत शिंदे

श्रीकांत शिंदे, www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. तसेच युवती सेनेच्या प्रभागासह महाविद्यालय परिसरात शाखा उद्घाटन करून जिल्ह्यात पक्षाची ताकद मजबूत करण्याचे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.

सिडको विभागातील खुटवडनगर भागात मंगळवारी (दि.28) दुपारी राज्यातील शिवसेनेच्या पहिल्या युवती सेनेच्या शाखेचे उद्घाटन खा. शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख संजय बच्छाव, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, युवा सेना उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष आविष्कार भुसे, युवा सेना लोकसभा संपर्कप्रमुख योगेश बेलदार, युवा सेना जिल्हाधिकारी रूपेश पालकर उपस्थित होते. आयोजक माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी युवती सेनेची शाखा अधिकारी स्वरूपा राऊत व उपशाखा अधिकारी अनुजा चव्हाण, हर्षदा दिवटे, स्नेहा शिरसाट, शीतल भवर, प्राची पवार, साक्षी बोरसे, वैशाली पगार, वैशाली मंडलिक, स्वाती मुसळे आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

The post नाशिक : युवती सेनेच्या शाखा वाढवा - खासदार श्रीकांत शिंदे appeared first on पुढारी.