
नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
सायने उपकेंद्र येथील एक्स्प्रेस फीडरवर तांत्रिक कामे करणे आवश्यक असल्याने वीजपुरवठा खंडित होणार आहे. गिरणा पंपिंग स्टेशन येथील विद्युतपुरवठा काही कालावधीसाठी खंडित होणार आहे. खंडित होणार्या वीजपुरवठ्यामुळे शनिवारी (दि.13) शहरातील पाणीपुरवठा करणे अशक्य होणार आहे. त्यानंतर दैनंदिन पाणीपुरवठा एक दिवसा आड करण्यात येईल. शनिवार (दि.13)चा पाणीपुरवठा रविवारी (दि.14) व रविवारचा (दि.14) पाणीपुरवठा सोमवारी (दि.15) करण्यात येईल. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी केले आहे.
हेही वाचा:
- नगर: पाणी ओतून कचर्याचे वजन ; महासभेत नगरसेवकांचा आरोप, चार दिवसांनी येते कचरागाडी
- IndiGo Flight : इंडिगो विमानाच्या केबिनमध्ये आला जळलेला वास, खबरदारी म्हणून केली इमर्जन्सी लँडिंग
- बीड : गावरान आंबा हद्दपार; आमराया नष्ट; झाडांची सर्रास कत्तल
The post नाशिक: येत्या शनिवारी पाणीपुरवठा खंडित appeared first on पुढारी.