नाशिक येथून मराठवाड्याकडे जाणा-या एसटी बस रद्द

एसटी

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; मराठा आंदोलनाचा नाशिक एसटी महामंडळाने चांगलाच धसका घेतला आहे. नाशिकहुन मराठवाड्याकडे जाणा-या बस या बंद करण्या आल्या आहेत. सकाळपासून नाशिकहुन एकही बस छत्रपती संभाजी नगर आणि जालन्याकडे रवाना झालेली नाही आहे. मराठवाड्यातूनही नाशिककडे महामंडळाची एकही बस आलेली नाही आहे. अचानक बस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. गावागावत राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात आहे. मराठा बांधवांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा देखील आज 6 वा दिवस आहे. त्यांच्या प्रकृती देखील खालावते आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये प्रचंड रोष वाढतो आहे. याचाच एसटी महामंडळाने धसका घेतला आहे. एसटी महामंडळाने मराठवाड्याकडे जाणा-या सगळ्या बसेस रद्द केल्या आहेत.

The post नाशिक येथून मराठवाड्याकडे जाणा-या एसटी बस रद्द appeared first on पुढारी.