येवला; पुढारी वृत्तसेवा : येवला शहरातील गंगादरवाजा भागात पतीने पत्नीला घरगुती वादातून धारदार शस्राने ठार केल्याची घटना सोमवारी (दि. १३) दुपारी घडली आहे.
शहरातील गंगादरवाजा भागात राहणाऱ्या बाळू शंकर जाधव वय 30 याने आपल्या पत्नी अर्चना बाळू जाधव याने आपल्या कौटुंबिक वादातून पत्नी अर्चना हिच्यावर धारदार शस्राने मानेवर वार करून गंभीर जखमी केले. स्थानिक नागरिकांनी जखमी अर्चना हिस येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने जखमी अर्चना ला नाशिक येथे हलवण्यात आले होते. मात्र तेथे तीस मयत घोषित करण्यात आले. याबाबत संशयित आरोपी बाळू शंकर जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून येवला शहर पोलिस ठाण्यात त्याचे विरुद्ध रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
The post नाशिक : येवला शहरात घरगुती वादातून पत्नीचा धारदार शस्राने खून appeared first on पुढारी.