नाशिक : येवल्यात छगन भुजबळ यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

येवला : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्न दिवसेंदिवस उग्ररुप धारण करत असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे- पाटील यांच्यावर अंबड येथे केलेल्या टीकेच्या निषेधार्थ येवला तालुक्यातील साबरवाडी (देवरगाव) सकल मराठा समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. Chhagan Bhujbal

यावेळी भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला. भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध करु नये, अशी अपेक्षा सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करत वातावरण दणाणून सोडण्यात आले. यानंतर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून भुजबळ यांची प्रतिमा जाळण्यात आली. Chhagan Bhujbal

यावेळी सकल मराठा समाजाचे किरण ठाकरे, विठ्ठल सालमुठे, साहेबराव दाभाडे, भाऊसाहेब लोखंडे, तुषार सालमुठे, भारत भवर, ज्ञानेश्वर लोखंडे, गणेश लोखंडे, रवी डांगे, नामदेव टेकडे, लक्ष्मण टेकडे, मनोज सालमुठे, नवनाथ सालमुठे, दत्तू लोखंडे, रामभाऊ लोखंडे, शिवाजी लोखंडे, विठ्ठल गव्हाणे, महेश दरेकर, किरण लोखंडे, दत्ता दाभाडे, दत्ता लोखंडे, अमोल ठाकरे, गोरडे, ज्ञानेश्वर वरपे, देवचंद ठाकरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

The post नाशिक : येवल्यात छगन भुजबळ यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा appeared first on पुढारी.