Site icon

नाशिक : रथोत्सवात घडले सामाजिक एकोप्याचे दर्शन

नाशिक (मुल्हेर) : पुढारी वृत्तसेवा
शेकडो वर्षांची परंपरा असलेला आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणारा रथोत्सव रविवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील सुप्रसिद्ध श्री उद्धव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा रथोत्सव साजरा केला जात असतो.

रविवारी सकाळी सात वाजता रामशाळेत उद्धव महाराज यांच्या मूर्तीचे व कलशाचे अकरा सवाष्ण जोडप्यांच्या हस्ते पूजन करून रथोत्सव सुरू करण्यात आला. रामशाळेपासून निघालेला रथ संपूर्ण गावातून फिरून श्री उद्धव महाराज समाधीस्थळी आणण्यात आला. गावातील प्रत्येक घरासमोर महिलावर्गाने आकर्षक सडारांगोळी केली होती. श्री उद्धव महाराज समाधी मंदिर येथे व्रज भाषेतील भजन व आरती करण्यात आली. यावेळी संस्थानचे प्रमुख हभप भक्तराज पंडित, किशोर पंडित, श्रीकांत पंडित आदी उपस्थित होते. याचबरोबर संस्थानतर्फे शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत सायंकाळी तुलसीविवाह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन श्रीकृष्ण व तुळस यांची पारंपरिक लहान रथातून मिरवणूक काढण्यात आली. रात्रभर चाललेल्या या रथयात्रेत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. महिलावर्गाने काढलेल्या आकर्षक रांगोळ्या रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाल्या होत्या. श्रीकृष्णलीला वर्णन असलेल्या व्रजभाषेतील भजनांनी परिसर दुमदुमून निघाला होता. भाविकांना संस्थानतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा:

The post नाशिक : रथोत्सवात घडले सामाजिक एकोप्याचे दर्शन appeared first on पुढारी.

Exit mobile version