Site icon

नाशिक : रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

देवळा नगरपंचायतीच्या वतीने रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नगराध्यक्षा सुलभा आहेर यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश देण्यात आले.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने घरकुल योजना राबविण्या येत असून स्वतःचे घर नाही अशा लोकांना मदत होत आहे. देवळा शहरातल्या गरजू लोकांना या योजनेच्या माध्यमातून याचा लाभ देण्यात येत आहे . यातील रमाई घरकुल योजने अंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना एका छोटेखानी कार्यक्रमात कार्यारंभ आदेश देण्यात आले . लाभार्थ्यांनी याकामी समाधान व्यक्त केले असून , घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू व्यक्तींनी नगरपंचात कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्षा सुलभा आहेर यांनी याप्रसंगी केले . यावेळी गटनेते संजय आहेर ,माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,नगरसेविका सुनंदा आहेर ,ऐश्वर्या आहेर , करण आहेर ,भूषण गांगुर्डे आदींसह मुख्याधिकारी शामकांत जाधव तसेच लाभार्थी उपस्थित होते .

हेही वाचा:

The post नाशिक : रमाई घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश appeared first on पुढारी.

Exit mobile version