नाशिक : रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याने रुग्णालयाला 25 हजारांचा दंड

हॉस्पीटल,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शरणपूर रोडवरील एका रुग्णालयाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या आदेशानुसार तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, आरोग्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि पश्चिम विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 4) नाशिक पश्चिम विभागांंतर्गत शरणपूर रोडवरील पंचवटी हॉस्पिटलचे डॉ. वसंत दराडे यांनी हॉस्पिटलमधील जैविक (बायोवेस्ट) कचरा सार्वजनिक रस्त्यावर टाकल्याबाबत त्यांना 25 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. यावेळी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : रस्त्यावर जैविक कचरा टाकल्याने रुग्णालयाला 25 हजारांचा दंड appeared first on पुढारी.