
नाशिक : पुढारी वृतसेवा
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे गुरुवारी (दि.1) एक दिवसाच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देऊन यावेळी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले. भोसला मिलिटरी स्कूलच्या वर्धापनदिन सोहळ्यास राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ओझर विमानतळ येथे स्वागताप्रसंगी पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखरपाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पलकुंडवर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, दिंडोरी प्रांत अधिकारी संदीप आहेर , निफाड प्रांत अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार प्रशांत पाटील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा:
- निपाणी : अवघ्या 20 मिनिटांत साडेतीन लाख लंपास
- सेल्फी विथ बाप्पा..
- पश्चिम हवेलीत तापाची लाट; आरोग्य केंद्रात मोफत डेंग्यू तपासणी
The post नाशिक : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझरला आगमन appeared first on पुढारी.