नाशिक : राज्यातील संगणक परिचालकांचा आजपासून बेमुदत संप

संगणक परिचालक www.pudhari.news

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा

ग्रामपंचायतीच्या कामाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पेलणार्‍या संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य होण्यासाठी मंगळवार (दि. 28) पासून राज्यातील संपूर्ण संगणक परिचालक बेमुदत संपावर जाणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाणार आहे. संगणक परिचालकांना ग्रा. पं. कर्मचारी दर्जा देण्यात आलेला नसून त्यामुळे या घटकास किमान समान वेतनाचाही लाभ मिळत नाही. या आंदोलनात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील संगणक परिचालक व आपले सरकार अंतर्गत संगणक चालक कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती इगतपुरी तालुका संघटनेचे पदाधिकारी गणेश पोरजे यांनी दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : राज्यातील संगणक परिचालकांचा आजपासून बेमुदत संप appeared first on पुढारी.