
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार 6 मे ते 3 जून यादरम्यान मसुरी येथे प्रशिक्षणासाठी जात असल्याने या कालावधीसाठी आयुक्तपदाचा प्रभारी कार्यभार शासन निर्देशानुसार विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविला आहे. राज्यातील 11 सनदी अधिकार्यांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली असून, त्यात पुलकुंडवार यांचाही समावेश आहे.
नाशिक महापालिकेत गेल्या सव्वा वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त पुलकुंडवार प्रशासक म्हणून 22 जुलै 2022 पासून कार्यरत असून, राज्यातील सरकार बदलल्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर पुलकुंडवार यांची नियुक्ती झाली आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदासाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. इच्छुक होते. परंतु, राज्य सरकारने त्यांच्याऐवजी डॉ. पुलकुंडवार यांची नियुक्ती केली होती. डॉ. पुलकुंडवार यांच्या प्रशिक्षण कालावधीत प्रभारी आयुक्तपदासाठी अधिकार्यांमध्ये लॉबिंग सुरू होते. अखेर गुरुवारी (दि. 4) राज्य सरकारने त्यांच्या प्रशिक्षण कालावधीतील रिक्त पदाचा अतिरिक्त भार गमेंकडे सोपविण्याचे आदेश काढले. त्यानुसार डॉ. पुलकुंडवार यांनी शुक्रवारी (दि. 5) गमेंकडे पदभार सोपवला असून, ते प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना झाले आहेत.
हेही वाचा:
- ट्यूमरचा छडा लावण्यासाठी नवे उपकरण विकसित
- समाजभान : यू ट्यूब गुरूंचा सुळसुळाट
- Shooting at Texas mall: टेक्सास मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; ८ जणांचा मृत्यू
The post नाशिक : राधाकृष्ण गमे यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार appeared first on पुढारी.