नाशिक : रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी

नाशिक रामकुंड,www.pudhari,news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम।

गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥

सोमवती अमावास्येनिमित्त (दि. १७) नाशिककरांनी घरोघरी दीपपूजन करत अग्निप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी घरातील सर्व दिव्यांचे एकत्रित पूजन करून त्यांच्यापुढे गोडा-धोडाचा नैवेद्य दाखविण्यात आला. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. आपल्या जीवनात मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावास्या साजरी करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये आषाढी अमावास्येला दीपपूजनाची परंपरा प्राचीन आहे. त्यामुळे याला दीप अमावास्या असेही म्हटले जाते.

दीप अमावास्येनिमित्त नागरिकांनी घरातील चांदी, पितळे व तांब्याचे दिवे घासून-पुसून स्वच्छ केले. त्यानंतर देवघरापुढे पाट मांडून त्याभोवती आकर्षक रांगोळी काढली. पाटावर स्वच्छ कापड अंथरून दिव्यांची मांडणी करीत त्याभोवती रंगीबेरंगी फुलांची आरास केली. काही ठिकाणी कणकेचे व मातीचे दिवे प्रज्वलित करून दीप अमावास्या साजरी केली गेली. यावेळी नागरिकांनी मनोभावे दीपपूजन करताना दिव्यांपुढे पुरणाचे दिंड व गोडाचा नैवेद्य दिव्यांना दाखविण्यात आला.

दिव्यांकडून प्रेरणा
आषाढ अमावास्या म्हणजेच दीप अमावास्या. या दिवशी घरातील दिव्यांचे पूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये आषाढानंतर येणाऱ्या श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये कमजोर झालेल्या पचनक्रियेला चालना देतानाच ती मजबूत करण्यासाठी दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा मिळते.

हेही वाचा :

The post नाशिक : रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी appeared first on पुढारी.