नाशिक : रामशेज किल्ल्यावर सिडकोतील तरुणाचा मृत्यू

सिडको : पुढारी वृत्तसेवा : रामशेज किल्ल्यावर सिडकोतील शिवपुरी चौकातील युवकाचा हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अजय सरोवर (वय २०) मृत युवकाचे नाव आहे. या घटनने सिडको परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिडकोतील उत्तमनगर परिसरातील शिवपुरी चौकात राहणारे नारायण सरोवर हे कुटुंबासमवेत आज (दि.३०) सकाळी रामशेज किल्ल्यावर गेले होते. किल्ल्यावर गेल्यावर त्यांचा मुलगा अजय (वय २०) चक्कर येऊन पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी नाशकातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.  अजय हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचे वडील नारायण सरोवर यांचा फळे विक्रीचा व्यवसाय आहे.

हेही वाचलंत का ? 

The post नाशिक : रामशेज किल्ल्यावर सिडकोतील तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.