नाशिक : ‘रामोळे आय’तर्फे आज मोफत मोतीबिंदू तपासणी

डोळे निरोगी राहण्यासाठी...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रामोळे आय हॉस्पिटलतर्फे दोनदिवसीय भव्य मोतीबिंदू तपासणी अभियान शनिवार (दि. 5) आणि रविवार (दि. 6) या कालावधीमध्ये सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. कॅनडा कॉर्नरजवळ संत आंद्रेय चर्चसमोरील रामोळे आय हॉस्पिटलमध्ये हे अभियान विनामूल्य ठेवण्यात आल्याची माहिती नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. अभिजित रामोळे यांनी दिली. शिबिरात संपूर्ण मोतीबिंदू स्क्रिनिंग ते मोतीबिंदू स्कॅन तपासणी पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार असून डॉ. अभिजित रामोळे यांचे मार्गदर्शनही मोफत असणार आहे. सर्व कॅशलेस सुविधा तसेच शासकीय कर्मचार्‍यांसाठी सीजीएचएस आरोग्य योजना, ईएसआयसी, एमएसईबी, एचएएल रिटायर्डच्या सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध असलेल्या या हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर विशेष सवलत देण्यात येणार आहे. या अभियानाचा लाभ नाशिककरांनी घेण्याचे आवाहन हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘रामोळे आय’तर्फे आज मोफत मोतीबिंदू तपासणी appeared first on पुढारी.