नाशिक : राष्ट्रवादीचे जितेंद्र पगार यांची शिंदे गटात एन्ट्री; कळवणमध्ये मोठे खिंडार

जितेंद्र पगार www.pudhari.news

नाशिक (कळवण) :  पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीच्या काँग्रेस शहरध्यक्ष जितेंद्र पगार यांचा शिंदे गटात प्रवेश केल्याने कळवण तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ काम करत असताना पक्षाअंतर्गत वादामुळे पगार यांच्यामध्ये नाराजी होती. त्यामुळे जितेंद्र पगार आणि नगरपंचायतीच्या माजी उपाध्यक्षा अनुराधा पगार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश घेतला आहे. येणाऱ्या काळात राष्टवादीला काँग्रेस मोठे खिंडार पडणार असल्याचे हे संकेत असून पक्षाअंतर्गत वादामुळे तालुक्यातील विकास कामे होत नसल्याने राष्टवादी काँगेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार यांनी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्टवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, एकलव्य संग्राम जिल्हा अध्यक्ष आणि आदिवासी आघाडीचे नेते प्रकाश निर्मला देशमुख, भूषण देशमुख, समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष हेमंत शेवाळे यांनी देखील पाठींबा दिला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : राष्ट्रवादीचे जितेंद्र पगार यांची शिंदे गटात एन्ट्री; कळवणमध्ये मोठे खिंडार appeared first on पुढारी.