
नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी
माजी नगराध्यक्ष आणि माजीआमदार पंकज भुजबळ यांचे कट्टर समर्थक आसलेले बाळा कलंत्री राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मनमाड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
बाळा कलंत्री यांनी आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादीचा त्याग केला असून, कंलत्री यांच्या या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात राजकीय खलबत सुरु झाले आहे. राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारणी कडून सातत्याने डावलले जात असल्याने तसेच कार्यकारणीत आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याच्या नाराजीच्या कारणामुळे बाळ कंलत्री यांनी दैनिक पुढारी सोबत बोलताना खंत व्यक्त केली.
हेही वाचा:
- पुणे : खा. बापट यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट !
- नाशिक : खासदार शरद पवार यांच्या हस्ते कादवा कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन
- Venkatesh Prasad : केएल राहुलला ‘पक्षपातीपणा’मुळे संघात स्थान! ‘या’ माजी खेळाडूचा आरोप
The post नाशिक : राष्ट्रवादीला झटका; माजी नगराध्यक्ष बाळा कलंत्री शिंदे गटात प्रवेश करणार appeared first on पुढारी.