नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातपूरला पथसंचलन

सातपूर संचलन www.pudhari.news

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने जाणता राजा मैदान अशोक नगर येथून पथसंचलन करण्यात आले. यावेळी विविध विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब ढिकले, सरचिटणीस डि. के. पवार, सैतवाल जैन संघ अध्यक्ष दिलीप शेठ काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

राज्यकर्मचारी, अशोकनगर, महाराणा प्रताप चौक, भाजी मंडई रोड, श्रीराम मंदिर, गायत्री कॉलनी, जय मल्हार चौक, राजराजेश्वरी चौक, वृंदावननगर, माळीकॉलनी, आयटीआय कॉलनी, दुर्गा मंदिर, श्रमिकनगर येथे संचलनाचा समारोप करण्यात आला. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भारत मातेच्या जयघोषात नागरिकांनी सडा, आकर्षक रांगोळी, पुष्पांचा वर्षाव करत संचलनाचे जल्लोषात स्वागत केले. सातपूर भोसला गटसह कार्यवाहक चंद्रशेखर मेहंदळे, सातपूरनगर कार्यवाहक सुमेध भंदुरे यांसह काळी टोपी, दंड संघाच्या संपूर्ण गणवेशात सातपूर संघाचे शेकडो स्वयंसेवकांनी या पथसंचलनात सहभाग घेतला.

लोकप्रतिनिधीनींही नोंदवला सहभाग :

ज्येष्ठ माजी नगरसेवक दिनकर पाटील, मंडळ अध्यक्ष भगवान काकड, गणेश बोलकर, अमोल पाटील, राजेश दराडे, रुपेश पाटील यांसह भाजप कार्यकर्त्यांनी देखील या संचलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

हेही वाचा:

The post नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातपूरला पथसंचलन appeared first on पुढारी.