नाशिक: राहूड घाटातील भीषण अपघातात ११ हज यात्रेकरू जखमी

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : मुंबई- आग्रा महामार्गावरील राहुड घाटाच्या पायथ्याशी हॉटेल मल्हारजवळ ट्रक व चारचाकीचा आज (दि.९) भीषण अपघात झाला. यात हज यात्रेहून परतणारे ११ जण गंभीर जखमी झाले. या घटनेची चांदवड पोलिसांत नोंद झाली आहे. जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात हाफिज खान (वय 38), जय्योद खान (24), आदीलखान, तब्बसुन बी आदीलखान (26), जमीन बी हासन खान (56), शेख जमील शेख इक्बाल (35), मुसाद परविन शेख (32), रेहान नजबी अब्दुल मणियार (45), बी शेख नजीर (32), सहील सय्यद रमजान (35), फैजल खान फिरोज खान (25) हे अकरा जण जखमी झाले. हे सर्व हज यात्रेकरू नाशिकहून मालेगावला निघाले होते.

यावेळी सोमा टोल कर्मचारी योगेश कोतवाल, संजय ठाकूर, शरद ठाकरे, बाबुराव धाकराव, विष्णू सूर्यवंशी, मयूर सोनवणे, विनोद बागुल, अमोल मोरे, अनिल झगडे, सौरभ देशमाने, ऋतिक सोनवने, सचिन गांगुर्डे यांनी बचावकार्य केले.

हेही वाचा 

The post नाशिक: राहूड घाटातील भीषण अपघातात ११ हज यात्रेकरू जखमी appeared first on पुढारी.