नाशिक : रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

नाशिक (पंचवटी) : काट्या मारुती पेट्रोलपंप ते दिंडोरी नाक्यादरम्यान अ‍ॅपे रिक्षाचालकाने दुचाकीस्वार महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेने पंचवटी पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीनुसार मंगळवारी हा प्रकार घडला. संशयिताने पाठलाग करून पीडितेचा विनयभंग केला.

हेही वाचा :

 

The post नाशिक : रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.