पिंपळनेर (ता.साक्री); पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील रुणमळी गावात गुरूवारी (दि.२७) मुलीची छेड काढल्याप्रकरणी दोन गटात तणाव निर्माण झाल्याची घटना घडली. मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला जेरबंद न करता फिर्यादींचीच समजूत काढल्याने जमाव संतप्त झाला. दरम्यान उफाळलेला वाद निवारण्यासाठी गेलेल्या निजामपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवरच दगडफेक करण्यात आला. जमावाने पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग करुन पोलिसांना घटनास्थळावरून पळवून लावले. घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा रुणमळी गावात धडकला असून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुणमळी गावात आज (दि. २७) सकाळी तरुणी रस्त्यावरून जात असतांना अन्य समाजातील एका तरुणाने तिची छेड काढली. त्यामुळे गावात दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे ठाणे अंमलदार प्रशांत ठाकूर यांच्यासह वाहनाने रुणमळी गावात गेले. त्यांनी दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले. मात्र, पोलिस आरोपींला पाठीशी घालत असल्याच्या गैरसमजातून जमाव पोलिसांविरोधात आक्रमक झाला. संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक करीत हल्लाबोळ केला. या हल्यात एक पोलीस जखमी असून सुदैवाने पोलिसांचे वाहन तेथून माघारी परतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, एलसीबीचे पीआय हेमंत पाटील यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून गावात पुर्णपणे संचारबंदी असून तणावपूर्ण शांतता आहे.
हेही वाचलंत का ?
- सांगली जिल्ह्यातील गलाई व्यवसायिकाचा दिल्लीत खून!
- हिंगोली : मोबाईल टॉवरच्या तांब्याची केबल चोरणारे दोघे गजाआड
- धक्कादायक ! फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार
The post नाशिक : रुणमळीत दोन गटात हाणामारी; पोलिसांच्या वाहनावर संतप्त जमावाचा हल्ला appeared first on पुढारी.