नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोडच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) एकलहरे रेल्वे ट्रॅक्शन कारखाना परिसरातून रेल्वेच्या संपत्तीची चोरी करणार्या आठ जणांना अटक करण्यात आली. मनमाड कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरफूल सिंह यादव यांनी दिली. चोरट्यांकडून 17 हजारांचा ऐवज आणि टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
रेल्वे कारखान्यातील रिग्रेशन हॉल गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. त्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी लोखंडी गेट, पंखे, इलेक्ट्रिक वायर आदींची चोरी केली. मजुरी करणार्या भुरट्या चोरट्यांकडून चोरी होत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. त्यानुसार दि.17 जुलैला आरपीएफचे सहायक निरीक्षक योगेश अहिर, हेड कॉन्स्टेबल विलास पेंढारी, दीपक राणा, कपिल कुमार, विजय पाटील, मनमाडचे सीबीआयचे किशोर चौधरी यांनी हरफूल सिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला.
कारखाना परिसरात पाच संशयित व्यक्ती टेम्पोतून (एमएच 15 बीजे 8560) आले. त्यांनी रेल्वे रिग्रेशन हॉलच्या बाजूला ठेवलेले तीन लोखंडी गेट टेम्पोत ठेवले. त्याचवेळी जवानांनी संशयितांना पकडले. योगेश अहिरे यांनी त्यांची चौकशी केली असता यामध्ये विलास दांडेकर (31, बालाजीनग), नवनाथ हमरेगे (24, एकलहरे), उमेश जाधव (20, जेलरोड), ज्ञानेश्वर चौहान (34, सामनगाव), अजय जाधव (23, जेलरोड), सुनील पाईकराव (29, जेलरोड, ) अशी चोरट्यांची नावे असून त्यांनी कबुली दिली.
हेही वाचा :
- पुणे : खंडणीखोर परदेशी टोळीवर मोक्का
- सोनिया गांधी यांच्याविरोधातील कारवाईच्या निषेधार्थ नाशिकमध्ये काँग्रेसची निदर्शने
- पिंपरी : जिजामाता रुग्णालयात हाडांच्या शस्त्रक्रियेचा अभाव
The post नाशिक : रेल्वेचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.