नाशिक : रेल्वेच्या सेवा प्रवाशांपर्यंत पोहोचतात का ? अमृत भारत योजनेअंतर्गत पाहणी

नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

भारत सरकारकडून रेल्वे प्रवाशांना देण्यात येणार्‍या सुविधा प्रवाशांपर्यंत पोहोचतात की नाही हे बघण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, गती-शक्ती युनिटचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक व इतर अधिकार्‍यांनी अमृत भारत योजनेअंतर्गत देवळाली, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव या स्थानकांची पाहणी केली. यावेळी प्रवाशाला दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था, मार्ग, स्थानकावरील शेड, प्रतीक्षालय, आराम कक्ष, पादचारी पूल, सरकता जिना, लिफ्ट याची पाहणी करून याबाबत माहिती देण्यात आली. या पाहणीवेळी वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक डॉ. शिवराज मानसपुरे, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता पालटासिंग, वरिष्ठ विभागीय सिग्नल व दूरसंचार अभियंता विजय कांची व अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : रेल्वेच्या सेवा प्रवाशांपर्यंत पोहोचतात का ? अमृत भारत योजनेअंतर्गत पाहणी appeared first on पुढारी.