नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, साडेसात लाखांना गंडा  

नोकरीचे आमिष www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून दोघा भामट्यांनी काही युवकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजकुमार मधुकर सानप (३९, रा. येवला रोड, ता. नांदगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित महादेव साहेबराव चव्हाण व त्याच्या जोडीदाराने २०१४ मध्ये हा गंडा घातला आहे.

सानप यांच्या फिर्यादीनुसार, दोघा संशयितांनी सानप व इतरांना रेल्वे खात्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्या मोबदल्यात संशयितांनी युवकांकडून ७ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, युवकांना नोकरी न देता संशयित पसार झाले. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांविरोधात सानप यांनी आडगाव पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष, साडेसात लाखांना गंडा   appeared first on पुढारी.