
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
कामगारविरोधी व मालकधार्जिण्या कामगार विधायकातील दुरुस्तींना विरोध करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन, रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशन, माथाडी कामगार युनियन, राष्ट्रीय दलित पँथर यांनी नाशिकरोड रेल्वे मालधक्का येथे आंदोलन केले. महसूल उपआयुक्त काटकर यांना निवेदन देण्यात आले.
कामगार नेते हिरामण तेलोरे, रिपब्लिकन एम्प्लॉइज जिल्हाध्यक्ष रामबाबा पठारे, स्वरूप वाघ, कैलास भालेराव, नाना खरे, शिवाजी फलके, किशोर गांगुर्डे, भगवान खाडे, अंकुश धिंदळे, रवि मोरे, सुभाष अहिरे, रवि जगताप, किरण काळे, राहुल वाघमारे, हिरामण गांगुर्डे, पांडुरंग बिन्नर आदी उपस्थित होते. विधेयकास सीटूसह सर्व कामगार संघटनांचा तीव्र विरोध आहे. या कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल कैदेची शिक्षा रद्द करण्याऐवजी महाराष्ट्रातील सर्व माथाडी, हमाल, संघटित कामगारांना मंडळात नोंदीसाठी तरतूद करायला हवी होती, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या दबावखाली दुरुस्ती केल्या जात आहेत. राज्याच्या तिजोरीत महसूल जमा करणार्या कामगारांच्या संरक्षणाऐवजी त्यांना मालकवर्गाच्या मर्जीवर सोडून देण्यासाठी या दुरुस्त्या केल्या जात आहेत. व्यवसाय सुलभतेसाठी कामगारवर्गाचा बळी देणे योग्य नाही, असे निवेदनात नमूद आहे.
हेही वाचा:
- Devon Conway : डेव्हॉन कॉनवेची कमाल, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ३७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित
- ना. शंभूराज देसाई यांच्यावर अवैध बांधकामाचा आरोप
- विधानभवनातून : अखेर विदर्भ, मराठवाड्याच्या चर्चेला तोंड फुटले !
The post नाशिक : रेल्वे मालधक्क्यावर माथाडींचे आंदोलन appeared first on पुढारी.