नाशिक; पुढारी वृतसेवा : येथील सकल मराठा समाजातर्फे नाशिक रोड येथील शिवाजी पुतळा परिसरात दहा गावातील नागरिक आज मंगळवारी ( दि.३१) सकाळी ११ वाजता साखळी उपोषणास बसणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात येत आहे.
येथील शिंदे, पळसे, जाखोरी, चांदगिरी, नानेगाव, बेलतगव्हान, मोह आदी गावातील नागरिक नाशिक पुणे रस्त्याने पायी नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे येणार आहेत. यावेळी निदर्शने केले जातील निदर्शनानंतर तीन दिवस साखळी उपोषणासाठी मराठा समाज बांधव बसणार आहे.
दरम्यान नाशिक रोड परिसरात मागील काही दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कॅन्डल मार्च काढण्यात येत आहे. जेलरोड परिसरात मंगळवारी रात्री कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. यामध्ये सकल मराठा समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जरांगे – पाटलांना पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत सोमवारी (दि.३०) सकल मराठा समाजातर्फे नाशिक रोड जेलरोड तसेच लगतच्या ग्रामीण भागात बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा :
- सिंधुदुर्गात मराठा समाज आक्रमक, गावागावात करणार उपोषण!
- काही तासात मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघेल : मंत्री गुलाबराव पाटील
- श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची आज भेट घेणार
The post नाशिक रोडला आज दहा गावातील नागरिक उपोषणाला बसणार appeared first on पुढारी.