नाशिक रोड : रेल्वेस्थानकावर सरकते जिने व पादचारी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण होऊन लवकर रस्ता प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहेत. लॉकडाउनच्या काळात रेल्वेस्थानकावर प्रवासी गाड्या बंद होत्या. या काळात रेल्वेस्थानकावर जुना पादचारी पूल काढणे, चार फलाटावर लिफ्ट बसविणे, सरकत्या जिन्याकडे जाणारे रस्ता बनवणे आदी विकासकामे करण्यात आली.
विकासकामांनी सजले नाशिकरोड रेल्वे स्थानक
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर तिकीट घराच्या मागे २०१८-१९ दरम्यान वयोवृद्ध, गरोदर माता, बालके, व्यंग, दिव्यांग सामान्य प्रवाशांना आपले अवजड सामान घेऊन चढ-उतर करावी लागू नये, या उद्देशाने सरकते जिने बनविण्यात आले आहेत. तसेच, सरकते जिने व फलाट दोन, तीन, चारवर जाण्यासाठी पादचारी पूल आहे. या पुलावरून उतरल्यानंतर स्थानकाबाहेर पडण्यासाठी रस्ता अरुंद होता. तसेच, सरकते जिना रेल्वेस्थानकात आहेत की नाही, हेसुद्धा प्रवाशांना माहीत होत नव्हते. त्यामुळे वयोवृद्ध, महिला, बालकांना पादचारी पुलावर जावे लागत होते.
हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना
रस्ता सुरळीत
सिंहस्थादरम्यान स्थानकांच्या पूर्व भागात सिन्नर फाटा येथे तिकीट घर बांधण्यात आले होते. सिंहस्थानंतर हे तिकीट घर रिकामे होते. त्या ठिकाणी स्थानकांच्या पश्चिम भागात असलेले आरक्षण कार्यालय हे सिन्नर फाटा येथील तिकीट घरात स्थलांतरित करण्यात आले. पूर्वीच्या आरक्षण केंद्रात जनरल तिकीट घर सुरू करण्यात आले. पूर्वीचे तिकीट घर पाडून याठिकाणी पादचारी व सरकत्या जिन्याकडे रस्ता करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्यासाठी रस्ता सुरळीत होणार आहे.
हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क