
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
बंद असलेल्या रो-हाऊसचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सुमारे 76 हजार पाचशे रुपये किमतीची सोन्या चांदीची दागिने चोरून नेल्याची घटना जेलरोड परिसरातील कॅनॉल रोड येथे घडली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी उत्तम सुखदेव सोनवणे (रा. चंपानगरी, कॅनॉल रोड, जेलरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अज्ञात चोरट्याने बंद रो हाऊसचे कडी कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील सोन्याचे चार वेढे, आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चांदीचे जोडवे व वेढा, चार हजार रुपये रोख व सॅमसंग कंपनीचा मोबाइल असा ऐवज चोरून नेला. दरम्यान, परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढल्याने भितीचे वातावरण आहे.यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बटुळे करत आहेत.
हेही वाचा :
- सातारा : जिल्ह्यातील धरणांलगत बांधकामास बंदी
- food delivery man : पुण्यात फूड डिलिव्हरी बॉयने घेतला तरुणीचा किस, अटकेनंतर जामिनावर सुटका
- सांगली : शिक्षकांनी जिल्हा बँकेचे थकवले 25 कोटी
The post नाशिक : रो-हाऊसचे कुलूप तोडून पाऊण लाखाची चोरी appeared first on पुढारी.