नाशिक: रौप्यमहोत्सवी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

गिरणा गाैरव पुरस्कार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणार्‍या गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे गिरणा गौरव पुरस्कार जाहीर झाले असून, यंदाच्या पुरस्कारामध्ये ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे (अमरावती) यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक मंगेश हडवळ (पुणे), पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार (मुंबई) यांच्यासह मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे (नाशिक) अशा 11 जणांची या निवड करण्यात आली आहे.

महाकवी कालिदास कलामंदिरात 5 एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती गिरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली. निवड समितीच्या बैठकीत या पुरस्काराच्या नावांची घोषणा करण्यात आली. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रामुख्याने सामाजिक, साहित्य, शैक्षणिक, सहकार, कला, संगीत क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या महाराष्ट्रातील नामवंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा या पुरस्कारासाठी गायक व गीतकार सचिन कुमावत (जळगाव), साने गुरुजी एज्युकेशन संस्थेचे प्रवीण जोशी (नाशिक), नाशिक कवीचे अध्यक्ष व साहित्यिक इंजि. बाळासाहेब मगर (नाशिक), शिवाजी दहिते-पाटील (धुळे), ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे (दिंडोरी), महिलांसाठी योगदान देणार्‍या स्वाती भामरे (नाशिक), शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे प्राचार्य डॉ. सुभाष भालेराव (येवला), कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला अध्यक्ष सुवर्णा जगताप (लासलगाव) यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. प्रकाश होळकर, दिलीप पाटील, राजेंद्र निकम, शंकर बोर्‍हाडे, रवींद्र मालुंजकर, शिवाजी जाधव, प्रल्हाद ठाकरे, संजय फतनानी या समितीने पुरस्कारार्थींची निवड केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक: रौप्यमहोत्सवी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.