
पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा: साक्री तालुक्यातील होळ्याचापाडा गावातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवले. आणि तिच्यावर शेतातील घरात बलात्कार केला. या प्रकरणी तरुणावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल रविंद्र ठाकरे (वय २२, रा. पुनाजीनगर, पो.टेंभे, प्र. वार्सा, ता. साक्री, ह. मु. पाटलीपाडा शिवार) याने मुलीस लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याच्या पाटलीपाडा शिवारातील शेतातील घरात नेऊन बळजबरीने बलात्कार केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, प्रभारी अधिकारी सपोनि. श्रीकृष्ण पारधी, बी.जी. शेवाळे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. आरोपीस ताब्यात घेतले.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली बी. जी. शेवाळे करत आहे.
हेही वाचा
- नाशिक : तुमच्या पतीला लाॅटरी लागल्याचे सांगून 80 वर्षीय वृद्धेला चार लाखांचा गंडा
- नाशिक : घराला तडे गेलेत, इर्शाळवाडी सारखं होण्याची वाट पाहताय का? शेतकऱ्याचा पत्रातून सवाल
- नाशिक : वरवंडी येथे गायींची वाहतुक करणारा ट्रक पकडला
The post नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार appeared first on पुढारी.