नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीनवर अत्याचार

अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

चोपडा येथे बहिणीकडे राहण्यासाठी आलेली मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर तीन दिवस शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील कालीकुंडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी चोपडा येथे राहत असलेल्या बहिणीकडे दि. ८ जुलै २०२२ रोजी आली होती. त्यानंतर तिने आरोपी सचिन ऊर्फ टिंगल्या मेवा (रा. कालीकुंडी, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) यास घेऊन जाण्यासाठी बोलाविले होते. त्यानुसार दि.२९ जुलै २०२२ रोजी आरोपी सचिन हा चोपडा येथे आला असता त्याने लग्नाचे आमिष देऊन युवतीला हरियाणा येथील मित्राकडे वास्तव्य करत युवतीवर अत्याचार केला. तेथून दोघे सेंधवा (मध्य प्रदेश) येथे नातेवाइकांकडे थांबले. तिथेही सचिनने युवतीवर अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलगी ही वारला (मध्य प्रदेश) येथे आल्यानंतर वारला पोलिस ठाण्यात तिने तक्रार दिली. याबाबत शून्य क्रमांकाने संशयित आरोपी सचिन ऊर्फ टिंगल्या मेवा याच्याविरोधात गुन्हा दाखल करून चोपडा शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीनवर अत्याचार appeared first on पुढारी.