
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नरच्या रविवारी मुख्य बाजार आवारात तसेच मंगळवारी वावी उपबाजार येथे भरणारा जनावरांचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती प्रशासक अर्चना सौंदाणे, सचिव विजय विखे यांनी दिली.
राज्यामध्ये लप्मी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जलद गतीने पसरत असल्याचे दिसून येत आहे. संशयित असलेल्या किंवा संक्रमित प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या द़ृष्टीने शासनाने सूचना दिलेल्या आहेत. राज्यामधून किंवा अन्य क्षेत्रामधून महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रामध्ये प्राण्यांच्या गोजातीय प्रजाती अजूनही प्रवेश करीत असल्याचे निदर्शनास आल्याने लप्मी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून बाजार बंद ठेवण्यात आलेला आहे. शेतकरी, जनावरे व्यापारी व जनावरे मध्यस्थ यांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासक सौंदाणे, सचिव विखे यांनी केले आहे.
हेही वाचा:
- Stray Dogs | भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण करा, पण कायदा हातात घेऊ नका : हायकोर्ट
- वीरमधून निरेत मोठा विसर्ग; 31 टीएमसी पाणी सोडल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली
- बेळगाव : बेकीनकेरे येथे हॉटेलमध्ये चोरीची घटना; पेट्रोल, ट्रॅक्टरमधील पाणे लंपास
The post नाशिक : लम्पीचा प्रादुर्भाव; सिन्नर, वावीत जनावरांचा बाजार बंद appeared first on पुढारी.