नाशिक : लष्करी जवानाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, दहा तोळे सोने चोरीला

घरफोडी,www.pudhari.news

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालु्नयातील वावीजवळच्या कहांडळवाडी येथे गुरुवारी (दि. 19) दुपारी दीड वाजेच्या सुमारास ‘बंटी-बबली’च्या जोडीने घरफोडी करून सुमारे दहा तोळे सोने व आठ ते दहा हजारांची रोकड लंपास केली. भारतीय सैन्य दलातील जवान भगवान रावसाहेब वाघ व शंकर रावसाहेब वाघ यांच्या घरात ही घरफोडी झाली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार एक महिला व पुरुष दोघेही युनिकॉन मोटारसायकलवरून आले होते. शिंदे आडनावाची व्यक्ती येथेच राहते का असे विचारत महिलेने शेजाऱ्यांना बोलण्यात गुंग केले. त्याचदरम्यान तिच्या सोबतच्या चोरट्यांनी वाघ यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला.

भगवान वाघ व शंकर वाघ हे दोघेही बंधू भारतीय सैन्यात नोकरीस आहेत. सध्या शंकर हे सुट्टीवर घरी आले असून कुटुंबियांसमवेत सहलीसाठी गेलेले आहेत. त्यांची आई मिराबाई या घरी एकट्याच आहेत. मात्र दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्या शेतात गेल्यानंतर बंटी-बबलीने हा डाव साधल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वावी पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : लष्करी जवानाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, दहा तोळे सोने चोरीला appeared first on पुढारी.