नाशिक : लाखोंच्या कुक्कुटखाद्यावर परस्पर मारला ताव, टेम्पोचालक फऱार

कुक्कुटखाद्य,www.pudhari.news

सिन्नर (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथील एका कंपनीतून कुक्कुटखाद्याच्या ३०० गोण्या घेऊन निघालेल्या टेम्पोचालकाने २ लाख ९० हजार रुपयांच्या १५० गोण्यांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यानंतर चालक फरार झाला आहे.

शिवाजी एकनाथ दिवटे (४४, रा. केडगाव, सुवर्णनगर, जि. अहमदनगर ) यांच्या मालकीचा आयशर टेम्पोमध्ये (क्र. एम. एच. १६ सी. सी. ३९५०) चालक सुरेंद्र तुनी यादव (रा. व्हीकोडी, जि. सिंधी, मध्य प्रदेश) याने ३०० कुक्कुटखाद्याच्या गोण्या भरून आणल्या होत्या. सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे येथे १०० गोण्या रिकाम्या केल्यानंतर उर्वरित गोण्या इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथे करण्यास सांगितले होते. मात्र, चालक सुरेंद्र यादव याने भरवीरकडे न जाता १५० गोण्यांची परस्पर विल्हेवाट लावली. या गोण्याची किंमत सुमारे २ लाख ९० हजार रुपये आहे. त्यानंतर चालक यादव फरार झाला असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

या प्रकरणी टेम्पोमालक दिवटे यांनी वावी पोलिस ठाण्यात चालकाच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्याच्या विरोधात वावी पोलिसांनी विश्वासघात करून अपहार केल्याप्रकरणी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दशरथ मोरे पुढील तपास करीत आहेत.

वावी जवळ टेम्पो आढळला बेवारस

दरम्यान, दीडशे गोण्यांची विल्हेवाट लावल्यानंतर टेम्पोचालकाने वावी शिवारात टेम्पो सोडून फरार झाला. तथापि, तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला. टेम्पो ताब्यात शिवाजी एकनाथ दिवटे (४४, रा. घेण्यात आला असून, यातील काही गोण्यांचा तपास वावी पोलिसांनी लावल्याचे समजते. टेम्पोत ५० गोण्या तशाच होत्या.

हेही वाचा : 

The post नाशिक : लाखोंच्या कुक्कुटखाद्यावर परस्पर मारला ताव, टेम्पोचालक फऱार appeared first on पुढारी.