नाशिक : लाच घेताना दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह तिघांना अटक

  • Post author:
  • Post category:Uncategorized
लाच

मालेगाव मध्य, पुढारी वृत्तसेवा : जनरल मुख्तारपत्र नोंदणी केलेला दस्त देण्याच्या बदल्यात ५०० रुपये लाच घेतल्याप्रकरणी सहायक दुय्यम निबंधक कार्यालयातील चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ लिपिक, डाटा एन्ट्री ऑपरेटर व एजंट यांचा समावेश आहे. एकूण चार जण लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.

तक्रारदाराने जनरल मुख्तारपत्र नोंदणी केलेला दस्त त्यांना देण्याच्या मोबदल्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील खाजगी व्यक्ती (एजंट) दत्तू देवरे यांनी पंचासमक्ष ५०० रुपये लाचेची मागणी केली. सह दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीक आरोपी लोकसेवक ज्ञानेश्‍वर जिभाऊ खांडेकर यांच्या सांगण्यावरून डाटा एन्ट्री ऑपरेटर विठोबा शेलार यांनी सदर लाचेची रकम स्वीकारली असता त्यांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. तिघांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी, पोलीस हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, प्रमोद चव्हाण, चालक परशुराम पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : लाच घेताना दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकासह तिघांना अटक appeared first on पुढारी.