नाशिक : लाच मागितल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा

लाच

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील मनपाच्या स्वच्छता विभागातील निरीक्षक तसेच एका कर्मचार्‍यावर सफाई कामगाराकडे पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. स्वच्छता निरीक्षक राजू देवराम निरभवणे व मुकादम बाळू दशरथ जाधव अशी दोघांची नावे आहेत.

दोन्ही कर्मचार्‍यांनी एका महिला कर्मचार्‍याकडे नेमून दिलेले काम न करणे, तसेच वेळेत उशीर झाले तर गैरहजेरी लागू नये, यासाठी सात हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र तडजोड अंती पाच हजार रुपये लाच देण्याचे ठरले. पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून कारवाई केली.

हेही वाचा :

The post नाशिक : लाच मागितल्याने मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा appeared first on पुढारी.