नाशिक : लासलगावी व्यापाऱ्याचा मृत्यू

पांडुरंग नारायए बकरे www.pudhari.news
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव येथील रेडिमेड कपड्याचे व्यापारी पांडुरंग बद्रीनारायण बकरे (५६) हे खाली पडल्याने त्यांच्या मेंदूस दुखापत होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, पांडुरंग बकरे रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तातडीने  त्यांना लासलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मेंदूला गंभीर इजा झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवले. नाशिक येथील मेडिकल कॉलेजमध्ये पांडुरंग बकरे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, शुक्रवार, दि. २१ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, वृद्ध आई असा परिवार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : लासलगावी व्यापाऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.