नाशिक : लाेकमान्य टिळक एक्स्प्रेसमधून धूर

लासलगाव www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

लासलगावजवळील उगाव रेल्वे स्टेशनवर लोकमान्य टिळक टर्मिनस नांदेड एक्स्प्रेस या गाडीच्या दोन डब्यांच्या खालील बाजूस धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. वेळीच घटना समजल्याने गाडी उगाव रेल्वेस्टेशनवर थांबवण्यात आल्याने मोठी हानी टळली.

धावत्या गाडीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच लासलगाव रेल्वेस्थानक सोडल्यानंतर साखळी ओढून सदर गाडी उगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ थांबवण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी नऊच्या दरम्यान नांदेड-कुर्ला हॉलिडे स्पेशल (07428) ही गाडी मनमाडहून नाशिककडे येत असताना लासलगाव रेल्वे स्टेशन ओलांडल्यानंतर गाडीच्या इंजिनपासून पाचव्या व सहाव्या बोगीच्या (एस ३ व एस ४) खालील बाजूने चाकामधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. धुराचे लोट मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांनी तत्काळ साखळी ओढून उगाव रेल्वेस्थानकात गाडी थांबवली. बोगीच्या चाकावरील प्लास्टिक ब्रेक गरम झाल्याने दूर निघत असल्याचे लक्षात आले. तब्बल ३५ मिनिटांनी अग्निरोधक पावडरचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले व गाडी रवाना झाली.

हॉट ॲक्सलमुळे लागली आग….
रेल्वे बोगीच्या लोखंडी चाकाला पूर्वी लोखंडी ब्रेक असायचे, आता त्याऐवजी रेल्वेने प्लास्टिक ब्रेक बसवल्याने उन्हाळ्याच्या उष्णतेने प्लास्टिक ब्रेक चाकाला चिकटल्याने (हाॅट ॲक्सल) धूर निघू लागला. उन्हाळ्यात थोड्याफार प्रमाणात अशा घटना घडतात. उगाव रेल्वेस्थानकात अपघातग्रस्त नांदेड-कुर्ला हॉलिडे स्पेशल गाडी उभी असताना खबरदारीचे उपाय म्हणून तपोवन एक्सप्रेससुद्धा उगावमध्ये काही काळ थांबवण्यात आली होती. नंतर गाडी मनमाडकडे रवाना झाली.

हेही वाचा:

The post नाशिक : लाेकमान्य टिळक एक्स्प्रेसमधून धूर appeared first on पुढारी.